बाबर्डे गाव हादरले; हत्ती उपद्रवामुळे शेतकरी कुटुंब कोलमडले

बाबर्डे गाव हादरले; हत्ती उपद्रवामुळे शेतकरी कुटुंब कोलमडले

*कोंकण एक्सप्रेस

*बाबर्डे गाव हादरले; हत्ती उपद्रवामुळे शेतकरी कुटुंब कोलमडले*

*दोड़ामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू असतानाही हत्तींचा उपद्रव थांबलेला नाही. वन विभागाने हत्तींचा कळप जंगलात रोखण्याचे आश्वासन दिले होते; मात्र रात्रीच्या वेळी हे प्रयत्न अपयशी ठरले.
काल रात्री बाबर्डे गावात ‘बाहुबली’ हत्तीने तुकाराम गावडे यांच्या शेतीत धुडगूस घातला. नारळ, सुपारी, केळी व अननसाची पिके उद्ध्वस्त झाली. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी संतप्त असून संयम सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!