*कोकण Express*
*बांद्यात विनाकारण फिरणाऱ्यांची उद्यापासून होणार “रॅपिड टेस्ट”…*
*ग्रामपंचायत,पोलीस व आरोग्य प्रशासनाचा निर्णय; सहकार्य करा,अक्रम खान यांचे आवाहन…*
*बांदा ः प्रतिनिधी*
टाळेबंदी आणि संचारबंदी असतानाही बांदा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या ही वाढतीच असल्याने उद्या सोमवार पासून शहरात अशा व्यक्तींवर कारवाई करत त्यांची अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय बांदा शहर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग शहरात अशा पद्धतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याने चांगलाच दणका बसला आहे. या कारवाईमुळे शहरात फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बांदा शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. यासाठी सरपंच अक्रम खान यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार बांदा शहरात उद्यापासून कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी संबंधितांचे स्वँब घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने यंत्रणा उभी केली आहे.
बांदा शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात विनाकारण फिरू नये असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.