*कोकण Express*

*कणकवली ः प्रतिनिधी*
कोविड काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याबाबत व आरोग्याच्या विविध प्रश्नांच्या मुद्द्यांवर माजी आमदार भाजप प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी व NRHM चे अतिरिक्त संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्याशी चर्चा केली. याबाबत माहिती देताना श्री जठार म्हणाले, आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य समस्येबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी मला त्वरित NRHM चे डाॅ सतिश पवार यांची भेट घेण्यास सांगीतले व लवकरच सिंधुदुर्ग दौर्यावर येण्याचे मान्य केले . डाॅ पवारांना यांना निवेदन देत सद्य परीस्थीतीची चर्चा केली. त्यावर त्यांनी त्वरित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर यांना फोन करुन माहिती घेतली व त्वरित पदे भरली जात नसतील तर एजन्सी अपाॅइंट करुन कोवीड साठी मनुष्यबळ वाढवा तसेच मी दिलेल्या सर्व मुद्याचे स्पष्टीकरण द्या असे निर्देश दिले. त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार (डाॅ पवार ) महाराष्ट्रातील सर्व जिल्हे NRHM कडे मोठ्या नीधीची मागणी करतात पण सिंघुदुर्गाने फक्त २ कोटी मागितले त्यावर मी त्यांना सांगितले प्रशासन मुंबईतून आलेली लोकसंख्या न मोजता निधी ची मागणी करते माझी विनंती आहे सि्धुदुर्गाला १० कोटीचा कोवीड नीधी NRHM मधुन देण्यात यावा त्यावर जिल्हा प्रशासनाने मागणी करावी असे सांगितल्याची माहिती श्री जठार यांनी दिली.