‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ

‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ

*कोंकण एक्सप्रेस*

*‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ*

*दोड़ामार्ग: शुभम गवस*

ग्रामपंचायत तळेखोल अंतर्गत जि. प. शाळा तळेखोल येथे ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते सुपारीच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमास ग्रामपंचायत तळेखोलच्या सरपंच सौ. वंदना सावंत, उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व बालवयापासून रुजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच सौ. वंदना सावंत यांनी केवळ वृक्ष लावणेच नव्हे तर त्यांचे संगोपन करणे तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग भविष्यातील हिरवळ वाढीसाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!