मालवणात १७ जानेवारीला व्याख्यानमालेचा शुभारंभ

मालवणात १७ जानेवारीला व्याख्यानमालेचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात १७ जानेवारीला व्याख्यानमालेचा शुभारंभ…*

*मोगल मर्दिनी क्षत्राणी महाराणी ताराराणी विषयावर रंगणार पहिले पुष्प…*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर यांच्या वतीने आयोजित कै. श्रीपादजी वाघ पुरस्कृत आणि कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १७ जानेवारी रोजी गुंफले जाणार आहे. या पहिल्या व्याख्यानाचा विषय ‘मोगल मर्दिनी क्षत्राणी शिवस्नुषा महाराणी ताराराणी’ असा असून या विषयावर प्रख्यात वक्त्या मालवण रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. ज्योती बुवा तोरसकर आपले विचार मांडणार आहेत.
महाराणी ताराराणी यांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या या व्याख्यानाचे आयोजन मालवणमधील भरड येथील श्री दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
तरी या ज्ञानयज्ञात मालवणमधील इतिहासप्रेमी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!