*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथे संपन्न*
*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथील चिवला बिच येथील रिसॅल्ट.Kalbadevi Exotika येथे बुध.दि.७ जाने.२०२६रोजी साजरा करण्यात आला. या स्नेह मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची सुरूवातीला स्व.शिवरामभाउ जाधव, स्व.डी बी ढोलम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर महीला सेवकांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून मेळाव्यास सुरूवात करण्यात आली. या वेळी ८० वर्षावरील सेवानिवृत्त सेवकांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देउन सत्कार करण्यात आला. मान्यवर सेवकांनी आपली मनोगते यावेळी प्रगट केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यावेळी उपस्थित राहीले व मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. सदर मेळावा आयोजना करीता डी.डी.आरेकर, देवानंद लोकेगांवकर,मिलींद सावंत, सतिश नाईक,अमित पंडीत रामदास रासम,नंदकुमार रेडकर,आर.वाय.सावंत,अजित महाडिक.यांनी व इतर बँकेच्या सेवानिवृत्त सेवकांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.बी.शिरसाट यांनी केले.

