आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम उत्साहात

आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम उत्साहात*

*दोडामार्ग : शुभम गवस*

आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लेखक व विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद गाथाडे उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. गाथाडे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचन, लेखन व समाजभान यांचे महत्त्व स्पष्ट करत वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. साहित्य, समाज आणि व्यक्तीघडण यांचा परस्परसंबंध उलगडून सांगताना वाचनातून विचारशक्ती विकसित होते, तर लेखनातून व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता साहित्याशी मैत्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आयक्यूएसी प्रमुख प्रा. ए. बी. ढेंगे होते. ‘लेखक आपल्या भेटीला’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक दृष्टी व सामाजिक जाणीव विकसित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदीप नाईक यांनी केले, तर आभार ग्रंथपाल बी. व्ही. राशिवडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!