*कोंकण एक्सप्रेस*
*संगीत भजन संवर्धक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम*
*कणकवली : प्रतिनिधि*
संगीत सांप्रदायिक भजन संस्कृती संवर्धक संस्था, हरकुळ बुद्रुकचा ८ वा वर्धापन बुधवार १४ जानेवारी रोजी हरकुळ बु. येथील श्री देव गांगेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ७ वा. संस्थेच्यावतीने भजनाचा कार्यक्रम, रात्री ८ वा. गावातील व्यक्तींचा सत्कार व मान्यवरांचा सन्मान सोहळा होणार आहे. या सोहळ्याला ह.भ.प. नंदादीप वंजारे, सरपंच आनंद ठाकूर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, बुवा गोपीनाथ लाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री १० वा. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा प्रयोग सादर होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

