आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधि*

सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब संघटना कुडाळ आणि आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. मल्लखांब महर्षी म्हणून ख्याती असलेले आणि आपल्या मल्लखांब कौशल्य कामगिरीमुळे पद्मश्री पुरस्कार विजेते श्री उदय देशपांडे सर तसेच छत्रपती पुरस्कार विजेते श्री.शांताराम जोशी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मल्लखांब प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि तज्ञांकडून आपल्या कौशल्यास चालना प्राप्त करून घ्यावी असे आवाहन जिल्हा मल्लखांब संघटन आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!