शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरणशेठ सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरणशेठ सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरणशेठ सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा*

शिवसेनेचे आमदार आदरणीय श्री. किरणशेठ सामंत यांचा वाढदिवस निमित्त शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरणशेठ सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना संजय आग्रे यांनी, आमदार किरणशेठ सामंत हे आपल्या राजकीय व संघटनात्मक वाटचालीतील आधारस्तंभ व मार्गदर्शक असल्याचे सांगत त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.
या भेटीवेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख श्री. संदेश सावंत पटेल हे उपस्थित होते. भेट अत्यंत आपुलकीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!