*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप धडाडीचे युवा नेते विशाल परब याच्या प्रमुख उपस्थितीत कारिवडे येथे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ दशावतारी नाटकाचा प्रयोग संपन्न.!*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कारिवडे गावातील श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि आपट्याचे गाव लिंगतवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने, गोठणेश्वर देवस्थान सुशोभीकरण पायाभरणी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा माझा’ या ट्रिकसीन नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने विशाल परब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन आभार मानले.
या कार्यक्रमाला भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य विशाल परब यावेळी दशावतार कलेतील योगदानाबद्दल त्यांनी प्रसिद्ध दशावतारी कलाकार गौरव शिर्के यांचा विशेष सत्कार केला. ग्रामीण भागातील ही पारंपारिक कला जोपासण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे परब यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान भाजप युवा नेते विशालजी परब यावेळी बोलताना त्यांनी हिंदू संस्कृती, परंपरा आणि दशावतार कलेचे जतन करण्याच्या कार्याचे कौतुक केले.
देवस्थान सुशोभीकरणाच्या पायाभरणीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. झालेल्या दशावतारी नाटकातील भव्य ‘ट्रिकसीन’ आणि कलाकारांच्या अभिनयाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. या कार्यक्रमाला कारिवडे आणि लिंगतवाडी परिसरातील भाविक व नाट्यरसिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी कारिवडे आणि लिंगतवाडी परिसरातील ग्रामस्थ, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, मायकल डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते

