यावर्षीचा वाढदिवस कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाच्या सेवा आणि सहयोगासाठी समर्पित!

यावर्षीचा वाढदिवस कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाच्या सेवा आणि सहयोगासाठी समर्पित!

*कोकण Express*

*यावर्षीचा वाढदिवस कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाच्या सेवा आणि सहयोगासाठी समर्पित!*

*कार्यकर्त्यांनी वाढदिवस कोणत्याही प्रकारे साजरा न करता कोरोनाशी लढण्यासाठी आपला वेळ द्यावा!*

*भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्यांना भावनात्मक आवाहन*

  *सिंधुदुर्ग*

कार्यकर्त्यांचे प्रेम मी समजू शकतो, अनेक वर्षांच्या नात्याचे हे ऋणानुबंध आहेत. मात्र ही वेळ फार धोक्याची आहे. कोरोना महामारीचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कित्येक जवळची माणसे आज आपल्याला सोडून जात आहेत, अनेकजण धोक्याच्या छायेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर कोणीही कार्यकर्त्याने यावर्षी आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.

श्री प्रमोद जठार यांचा उद्या सोमवार दिनांक १९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी कार्यकर्ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत हा वाढदिवस दणक्यात साजरा करतात. मात्र यावेळी हा वाढदिवस कोणत्याही अन्य कार्यक्रमातून साजरा न करता कार्यकर्त्यांनी आपला वेळ कोरोनाशी लढण्याच्या कामात द्यावा. वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे कोरोनायोद्धे यांच्याशी सहयोगातून कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या प्रेमाचे मला नेहमीच कौतुक होते व राहील. सगळे या संघर्षात यशस्वी होऊन कोरोनाला पराभूत करूया आणि पुढच्या वर्षी याच जोशाने व उत्साहाने एकत्र हा आनंद साजरा करू, असे सांगत श्री जठार यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांना आपली व कुटुंबियांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

श्री प्रमोद जठार यांच्या सामाजिक संवेदनशिलतेचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला असून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!