*कोंकण एक्सप्रेस*
*वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय आयोजित क्रीडा स्पर्धेत ओपीडी संघ पुरुष गट तर जे एन एम संघ ठरला विजेता*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग नगरी – येथील वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय आयोजित क्रीडा स्पर्धेत ओपीडी संघ पुरुष गट तर जे एन एम संघविजेता ठरला विजेत्या संघांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले
सिधुदुर्गनगरी येथेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग अंतर्गत भव्य क्रीडास्पर्धेचे आयोजनपुरुष गटामध्ये ‘ ओपीडी वॉरियर्स’ आणि महिला गटामध्ये ‘ जीएनएम नर्सिंग गर्ल्स’ ठरले विजेतेः जिल्हाधिकारी, श्रीम. तृप्तीधोडमिसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरणशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांचे वतीने दि. १ जानेवारी ते दि. ४ जानेवारी २०२६ या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य वार्षिक कीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या चार दिवसीय महोत्सवात वैद्रद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संघानी सहभाग नोंदवून मैदानावर आपले कौशल्य दाखवले.
सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित या क्रीडा स्पर्धाउद्घाटन समारभस्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मा. नयौनी साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रिकेटच्या चुरशीच्या सामन्यांमध्ये एकूण १६ पुरुष संघ तसेच एकूण ०६ महिला संघानी सहभाग घेतला होता.
पुरुष गदः अंतिम सामन्यात ‘ ओपीडी वॉरियर्स’ संघाने उत्कृष्ट सांधिक कामगिरीचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर ‘ जीएनएम डॉक्टर्स’ संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिला गटः महिलांच्या सामन्यात ‘ जीएनएम नर्सिंग गर्ल्स संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांकपटकावला, तर ‘ब्लड बैंक व सिस्टर्स संघ उपविजेता ठरला.
अष्टपैलू पुरुष खेळाडू पुरस्कार विजेते उत्कृष्ट फलदाज- डॉ. विजय वाघमारे, मॅन ऑफ द टुरनामेंट श्री. रुपेश सावंत, उत्कृष्ट गोलंदाज श्री. विशाल माने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री. पंकज आदुर्लेकर.अष्टपैलू महिला खेळाडू पुरस्कार विजेते उत्कृष्ट फलंदाज कु. सायली साळगावकर, मॅन ऑफ द टुरनामेट कु लक्ष्मी नाईक, उत्कृष्ट गोलंदाज श्रीम. जयश्री वसावे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कु. स्नेहल कांबळे.
पारितोषिक वितरणअंतिम सामन्याचा टॉस तसेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीम, तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विजेत्या संघांना आणि वैयक्तिक स्तरावर उत्कृष्ट खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मा. जिल्हाधिकारी महोदयांनी वैद्रद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खिलाडूवृत्तीचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्याला अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उप-अधिष्ठाता डॉ. संतोष फुपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, व सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला. श्री. नितीन तुरनर, समाजसेवा अधिक्षक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

