*कोंकण एक्सप्रेस*
*कर्ले महाविद्यालयाच्या अक्षता मोंडकर आधुनिक सावित्री*
*करिअर संसदेचे बारामती येथे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सूरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत देण्यात येणारा आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगावच्या प्राध्यापिका अक्षता हरिश्चंद्र मोंडकर यांना ३जानेवारी रोजी बारामती येथे गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर संसदेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन ३ ते ७ जानेवारी या कालावधित बारामती येथे सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा देऊन स्त्री शिक्षण व महिला सबलीकरणाचा दीपस्तंभ सर्वासमोर उभा केला यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या युगात अविरतपणे चालवून आधुनिक काळातील बदलत्या शैक्षणिक, सामाजिक, उद्योजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहाला अनुसरून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भरीव कामगिरी केलेल्या राज्यातील १९ महिलांचा करिअर कट्ट्याच्यावतीने आधुनिक सावित्री २०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात सिंधुदुर्गातून शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याच्या उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष राजेंद्र पवार यशदाचे उपमहासंचालक डॉ.शेखर गायकवाड इंडीयन रेल्वे पर्सोनल सव्हीसचे तुषाबा शिंदे सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.देवीदास वायदंडे डॉं. नितीन घोरपडे माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे शारदाबाई पवार महाविघालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी राज्यस्तरीय करीअर संसदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय तळवणकर सचिव डॉ. एस.डी. देशभ्रतार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले सर्व संचालक पदाधिकारी महाविघालयाचे चेअरमन संभाजी साटम प्राचार्य समिर तारी यांनी अभिनंदन केले.

