*कोंकण एक्सप्रेस*
*सातारा : अ. भा. साहित्य संमेलनातील कवीकट्टामध्ये राजस रेगे यांचा सन्मान करताना मान्यवर*
*अ. भा. साहित्य संमेलनात राजस रेगे यांचे काव्यवाचन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टामध्ये कणकवली येथील कवी राजस रेगे यांनी ‘कळी फुललीच’ ही कविता सादर केली. कवीकट्टामध्ये राज्यातील अनेक नामवंत कवींनी सहभाग घेतला होता. कविता सादर केल्यानंतर आयोजकांतर्फे राजस रेगे यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी कट्टा संपन्न झाला.

