कणकवली नगरपंचायत ने कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

कणकवली नगरपंचायत ने कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

*कोकण  Express*

*कणकवली नगरपंचायत ने कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांनी केले कौतुक*

 देवगड, वैभववाडी नगरपालिकेने ही स्वतःची कोविड सेंटर तयार करा, पालकमंत्र्यांच्या सूचना

​*कणकवली ः प्रतिनिधी*

​कणकवली नगरपंचायत ने कोविड केअर सेंटर ची निर्मिती करून कोविडच्या या कठीण काळात चांगला पायंडा पाडला. याच धर्तीवर देवगड, वैभववाडी नगरपंचायतने देखील स्वतःची कोविड केअर सेंटर निर्माण करा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. तसेच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुकही केले.
कोविड च्या कालावधीत येणाऱ्या समस्या व त्याचा आढावा या संदर्भात पालकमंत्र्यांनी प्रांताधिकार्‍यांसह कणकवली मतदार संघातील तीनही तालुक्यातील सभापती, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी तालुकानिहाय कोविड केअर सेंटर चा आढावा घेत असताना आमदार वैभव नाईक व एस एस पी एम हॉस्पिटल यांनी प्रत्येकी  ​५० बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे पालकमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.  त्याच वेळी आमदार वैभव नाईक यांनी  कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उल्लेख करत नगराध्यक्षांनी ही ​२५ बेड उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले. कणकवली नगरपंचायत ने कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले. मात्र नगराध्यक्ष  नलावडे यांनी नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला  अद्याप परवानगी मिळालेली नाही असे पालकमंत्र्यांकडे स्पष्ट केले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्हाला परवानगी कशाला हवी, तुम्ही सुरू करा अशा सूचना दिल्या.तेथे  दाखल झालेल्या रुग्णांच्या जेवणाची  व अन्य सोयी सुविधांची काय व्यवस्था केली याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा केली. नगराध्यक्ष  नलावडे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, जेवण, नाष्टा  या सुविधा नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारामार्फत पुरवण्याचे त्यांनी मान्य केल्याची नलावडे यांनी सांगितले. या ठिकाणी आवश्यक असलेल्या बेडची व्यवस्था नगरपंचायत करणार असून, स्वच्छतागृह व त्या पर्यटन सुविधा केंद्राची साफसफाई देखील  करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  कणकवली नगरपंचायत चा हा पायंडा अंमलात आणून इतर नगरपालिकांनी देखील रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करा. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवा. त्यांच्याकडून आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी देखील देण्यात येतील असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. देवगड नगरपंचायत मार्फत कोविड केअर सेंटरची सुविधा तयार करण्यात येत असून, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी सांगितले. मात्र त्या पूर्वी कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने मान्यता द्या अशी मागणी  साळसकर केली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी तीनही नगरपालिकां कडून मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करा. तातडीने मान्यता देण्यात येईल असे  सामंत यांनी स्पष्ट केले. मृत्यू झालेल्या कोविड च्या रुग्णांवर अंत्यविधी करण्याकरिता कणकवली शहरातील मृत रुग्णाची व्यवस्था नगरपंचायत करते. मात्र ग्राम पातळीवरील मृत्यू झालेले कोविडच्या रुग्णांना शहराच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी आणले जाते. त्या संदर्भात सूचना देण्याची मागणी नगराध्यक्ष नलावडे यांनी केली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी ज्या ग्रामपंचायत मधील हद्दीतील व्यक्ती मृत होईल त्यांचा अंत्यविधी त्याच गावातील स्मशानभूमीत करणेबाबत प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना सूचना द्या व गटविकास अधिकाऱ्यांनी त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीला तसे आदेश द्यावेत अशा सूचना  सामंत यांनी दिल्या. या बैठकीला आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर जे पवार, कणकवली सभापती मनोज रावराणे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगड नगराध्यक्ष प्रियांका साळसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!