*कोकण Express*
*कुडाळ पोलिसांची “रॅपिड टेस्ट” मोहीम अन्…गर्दी गायब….*
*अनोखा उपक्रम ; मनसे जिल्हाध्यक्षांकडून पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत…*
लॉकडाउन निर्बंधांच्या काळात कुडाळ शहर परिसरात नाहक दुचाकी घेवून फिरणाऱ्यांची पोलिसांनी जाग्यावर रॅपिड टेस्ट सुरू केली. त्यामुळे काही क्षणात रस्त्यावर असलेली गर्दी व नाहक फिरणारे लोक गायब झाले. दरम्यान या अनोख्या उपक्रमाचे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी स्वागत केले आहे. तसेच नाहक फिरणाऱ्या लोकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेली भूमिका अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.