*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून मालवणातील पत्रकारांना पुरस्कार वितरण*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी केले.
मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार वितरण मसूरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी उमेश तोरसकर हे बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, साहित्यिका वैशाली पंडित, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी उपस्थित होते. प्रारंभी तालुका अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी छायाचित्रकार – पत्रकार गणेश गांवकर यांना स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार सुधीर पडेलकर यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आणि पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना बेस्ट स्टोरी अवॉर्ड (मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच यावेळी पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल पत्रकार महेश सरनाईक, मुख्याध्यापिका शुभांगी अमित खोत, पोलीस पाटील प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रम झाले.
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले, मालवण तालुक्यात हजर झाल्यानंतर माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मालवण तालुक्यात काम करताना पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकांभिमुख काम करण्याचा आपला प्रयत्न राहील. मालवण तालुका प्रशासकीय दृष्ठ्या चांगला तालुका करण्याचा आपला प्रयत्न पुढील काळात असेल, असेही ते म्हणाले. गटविकास अधिकारी शाम चव्हाण म्हणाले, प्रशासनाला पत्रकारांचे चांगले सहकार्य लाभते. पत्रकार संघाकडून सन्मान होणे म्हणजे मोठा सन्मान आहे. यापुढेही प्रशासनाला चांगले सहकार्य पत्रकारांचे लाभावे, वंचित घटकाना न्याय देण्याचे काम पत्रकार करत आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. सरोज परब, राजन परब, यांनीही विचार मांडत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले. यावेळी मसूरे मंडळ अधिकारी श्री. शिंगरे, ग्रामसेवक श्री. मगम, डॉ. विश्वास साठे, शिवाजी परब, विलास मेस्त्री, पत्रकार नंदकिशोर महाजन, महेश सरनाईक, समीर म्हाडगूत, विशाल वाईरकर, मनोज चव्हाण, राजेश पारधी, कुणाल मांजरेकर, अमोल गोसावी, अर्जुन बापर्डेकर, संदीप बोडवे, आपा मालंडकर, सौगंधराज बादेकर, परेश सावंत, संग्राम कासले, नितीन गावडे, भूषण मेतर, उदय बापर्डेकर, अनिल तोंडवळकर, महेश कदम, शैलेश मसूरकर, झुंजार पेडणेकर, केशव भोगले आदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

