श्वेता मेस्त्री यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

श्वेता मेस्त्री यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

*कोंकण एक्सप्रेस*

*श्वेता मेस्त्री यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर प्रशालेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षका पुरस्कार जि. प. शाळा हळवल नंबर १ च्या मुख्याध्यापिका श्वेता सुहास मेस्त्री यांना जाहीर झाला होता. विद्यामंदिरच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जि. प. हळवल नं. १ चे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!