विमानाने इस्त्रो सफर आणि लाखो रुपयांची रोख बक्षिसे देणारी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2026 चे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आयोजन

विमानाने इस्त्रो सफर आणि लाखो रुपयांची रोख बक्षिसे देणारी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2026 चे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*विमानाने इस्त्रो सफर आणि लाखो रुपयांची रोख बक्षिसे देणारी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2026 चे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आयोजन*

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 9 वे वर्ष असून *सिधुदुर्ग जिल्ह्यात 27 परीक्षा केंद्रावर* ही परीक्षा होणार आहे.इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातून होणार आहे. यावर्षी STS परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातून 12348 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
प्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके , सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच *4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री , च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर* ला भेटी साठी घेऊन जाण्यात येणार आहे.
या परीक्षेचे *मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली* असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे
@ फोंडा हायस्कूल, फोंडा
@ जि. प. प्राथ.शाळा खारेपाटण न १
@ वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
@ कनेडी हायस्कूल, सांगवे
@ शिरगाव हायस्कूल, शिरगाव
@ जि. प. प्राथ. शाळा जामसंडे न १, देवगड
@ जि. प. प्राथ. शाळा कुणकेश्वर न १, देवगड
@ पडेल हायस्कूल, पडेल
@ रामगड हायस्कूल, रामगड
@ न्यू इंग्लिश स्कूल आचरे
@ टोपीवाला हायस्कूल,मालवण
@ वराडकर हायस्कूल कट्टा
@ कुडाळ हायस्कूल,कुडाळ
@ न्यू इंग्लिश स्कूल कसाल
@ वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
@ कळसुलकर हायस्कूल ,सावंतवाडी
@ सैनिक स्कूल,आंबोली
@ शाळा माडखोल न १
@ शाळा मळेवाड न १
@ खेमराज मेमो. हायस्कूल,बांदा
@ कलंबिस्त हायस्कूल, कलंबिस्त
@मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव
@ न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग
@ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
@ बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला
@अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे *निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.*
यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , कोल्हापुर,पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत(माजी जी प अध्यक्ष) यांनी केले असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!