*कोंकण एक्सप्रेस*
*गांगोवाडी येथे शिवसेना उपनेते मा. श्री. संजय आंग्रे साहेब यांच्या हस्ते*
*ओव्हर आर्म लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट | ता. कणकवली | जि. सिंधुदुर्ग दि. 2 जानेवारी 2026
हर्षद सावंत मित्र मंडळ आयोजित भव्य ओव्हर आर्म लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 चा उद्घाटन सोहळा शिवसेना उपनेते मा. श्री. संजय आंग्रे साहेब यांच्या शुभहस्ते फोंडाघाट, गांगोवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील मान्यवर, क्रीडाप्रेमी युवक तसेच वाडीतील वडिलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. उद्घाटनप्रसंगी मा. श्री. संजय आंग्रे साहेब यांनी खेळाडूंना खेळातील शिस्त, संघभावना व सातत्याचे महत्त्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा कालावधी दि. 2, 3 व 4 जानेवारी 2026 असा असून, उद्घाटनाच्या दिवशी अनेक चुरशीच्या सामने खेळविण्यात आले. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख श्री. संदेश पटेल, श्री. युवराज आग्रे, श्री. भामा सावंत, श्री. हर्षद सावंत, श्री. विजय लाड, श्री. मारुती मेस्त्री, तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षद सावंत मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, युवकांना व्यासपीठ देणाऱ्या अशा क्रीडा स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा देणाऱ्या ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

