मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : श्री अच्युत सावंत-भोसले

मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : श्री अच्युत सावंत-भोसले

*कोंकण एक्सप्रेस*

*मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : श्री अच्युत सावंत-भोसले*

*कणकवली ः संजना हळदिवे*

जे विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास होऊन ज्ञान प्राप्ती बरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ते संस्कारक्षम होतात. मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, संगीत, खेळ, कला अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसतात असे प्रतिपादन विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अच्युत सावंत-भोसले, कार्याध्यक्ष, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर संदीप चौकेकर, अध्यक्ष, प्राणीजीवन सहयोग संस्था, कणकवली, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन शेळके, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष बाबुराव सावंत, माजी मुख्याध्यापक जी. ए. खांबल, डॉक्टर अनिल ठाकूर, मुख्याध्यापिका श्वेता करंबेळकर, मनोज राणे, प्रशांत गावडे, कृष्णा यादव, श्रद्धा कदम, रश्मी माणगावकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख, कविता, गोष्टी तसेच चित्राने सजलेला ‘कोकण’ या विषयावरील परिमल हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक
डॉ. पी. जे. कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की विद्यामंदिर हायस्कूलने शिक्षणाबरोबरच कला, संगीत, खेळ, विज्ञान, स्पर्धा परीक्षा तसेच सामाजिक बांधिलकी व संस्कृती जोपासणारी उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. याचे श्रेय त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारी संस्था, कार्यतत्पर शिक्षक व सेवाभावी चतुर्थी कर्मचारी यांना दिले. यावेळी प्रमुख पाहुणे संदीप चौकेकर, अध्यक्ष, प्राणीजीवन सहयोग संस्था, कणकवली यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना सांगितले की जीवनात खूप प्रगती करा पण तुमच्या आई-वडिलांचे, शाळेचे, समाजाचे ऋण फेडायला विसरू नका. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रगती करून शाळेचे नाव आणखी मोठे करावे असे आवाहन केले.
प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी अहवाल वाचन केले. राजेश सिंगनाथ यांनी यशस्वीपणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . तंत्रस्नेही शिक्षक नेताजी जाधव यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती पीपीटी द्वारे प्रोजेक्टर वर दाखवली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन शेळके, शर्मिला केळुस्कर, कला शिक्षक प्रसाद राणे, इतर शिक्षक तसेच प्रशालेच्या लिपिक मनिषा पाटील यांनी यशस्वीपणे केले. आभार प्रदर्शन संगीता साटम यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!