श्री. दिनेश गांवकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे व माजी आमदार श्री. राजन तेली यांची सदिच्छा भेट

श्री. दिनेश गांवकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे व माजी आमदार श्री. राजन तेली यांची सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. दिनेश गांवकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे व माजी आमदार श्री. राजन तेली यांची सदिच्छा भेट….*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड येथे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ दि. 01 जानेवारी ते 05 जानेवारी 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेचे आयोजन श्री. दिनेश गांवकर मित्रमंडळ, देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेला आज शिवसेना उपनेते मा. श्री. संजयजी आग्रे साहेब व शिवसेना माजी आमदार मा. श्री. राजन तेली साहेब, कणकवली विधानसभा प्रमुख श्री. संदेश पटेल तसेच श्री. युवराज आग्रे यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमावेळी आयोजक मंडळाच्या वतीने मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मा. संजयजी आग्रे साहेब व मा. राजन तेली साहेब यांनी स्पर्धेला मनःपूर्वक शुभेच्छा देत खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी देवगड तालुका प्रमुख श्री. अमोल लोके, देवगड नगराध्यक्षा सौ. साक्षी प्रभु तसेच देवगड युवा तालुका प्रमुख श्री. दिनेश गांवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!