*कोंकण एक्सप्रेस*
*आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीचा जत्रोत्सव शनिवार दि . ३/०१/२०२६ रोजी*
*वैभववाडी (प्रतिनिधी)*
आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीचा जत्रोत्सव शनिवार दिनांक ३/०१/२०२५ रोजी तरी या जत्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . श्री रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आचिर्णे संचलित सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग एस एस पी एम हॉस्पीटल पडवे यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे शिबिराचा वेळ सकाळी ९:०० ते दुपारी १:०० पर्यंत असेल
तसेच आई रासाई देवीच्या जत्रोत्सवा निमित्त भव्य जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा ठीक ७:०० वाजता चालू होईल तसेच या स्पर्धेसाठी पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत . या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रु . ११०००/ व चषक
द्वीतीय क्रमांकास रु . ७५०० / व चषक
तृतीय क्रमांकास रु . ५५००/ व चषक
उत्तेजनार्थ प्रथम रु . ३००० / व चषक
उत्तेजनार्थ द्वीतीय रु .२०००/ व
उत्तेजनार्थ तृतीय रु . १००० / व चषक
अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत .

