*कोंकण एक्सप्रेस*
*कुणकेश्वर देवालय आरो प्लॉट चे लोकार्पण मा. एकनाथ तेली अध्यक्ष श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे हस्ते करण्यात आले*
*कुणकेश्वर : प्रतिनिधी*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर मार्फत कुणकेश्वर देवालय येथे ro प्लॉट चे लोकार्पण माननीय एकनाथ तेली अध्यक्ष श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे हस्ते करणेत आले. सदर वॉटर प्लांट चे माध्यमातून 1 रुपये प्रति लिटर दराने शुद्ध स्वच्छ व थंड पाणी ग्रामस्थ व पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सदस्य चंद्रकांत घाडी, आचरेकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय आचरेकर ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील देवस्थान ट्रस्ट चे श्री पेडणेकर, श्री. रामदास तेजम , ट्रस्टी श्री. श्रीकृष्ण बोंडाळे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. ऋषिकेश चव्हाण , श्री. राजेंद्र तेली,श्री. मंगेश मेस्त्री, श्री. अमित सावंत, श्रीम. प्रियांका चव्हाण, श्रीम. दीपश्री दळवी, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते

