मसुरे मर्डेवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्य सहवास संस्थेचे सर्वेसर्वा श्री. विजय कोदे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन*

मसुरे मर्डेवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्य सहवास संस्थेचे सर्वेसर्वा श्री. विजय कोदे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन*

*कोंकण एक्सप्रेस*

*मसुरे मर्डेवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्य सहवास संस्थेचे सर्वेसर्वा श्री. विजय कोदे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन*

*मालवण दि प्रतिनिधी*

मसुरे मर्डेवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्य सहवास संस्थेचे सर्वेसर्वा श्री. विजय कोदे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. कोदे यांनी आयुष्यभर साहित्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. ग्रामीण भागातील प्रश्न, सामान्य माणसाचे दुःख, कोकणची संस्कृती आणि सामाजिक वास्तव त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडले. साहित्य सहवास संस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

पत्रकार म्हणून त्यांनी निर्भीड लेखनाची भूमिका कायम ठेवली, तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून विविध उपक्रमांतून समाजहितासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या कार्यामुळे ते साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आदराने ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात मुलगी एश्वर्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मसुरे मर्डेवाडीसह संपूर्ण कोकण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!