मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर

मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर*

*मालवण : प्रतिनिधी*

ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते दान म्हणजे रक्तदान आहे हे जाणून रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे

रक्तदान हे श्रेष्ठदान” असे म्हटले जाते. रक्तदान शिबिरात सहभागी होणे म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याला नवी आशा देणे होय. प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याच्या उदात्त हेतूने दि ४ जानेवारी ते १८ जानेवारी रोजी सर्वत्र रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून मालवणात रक्तदान शिबिर होत आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रक्तदात्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य संप्रदाय तालुका सेवा समिती मालवण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!