मालवणात १० रोजी मद्यमुक्तीविषयी जनजागृती सभा

मालवणात १० रोजी मद्यमुक्तीविषयी जनजागृती सभा

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात १० रोजी मद्यमुक्तीविषयी जनजागृती सभा*

*मालवण (प्रतिनिधी)*

मद्यमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहोलीक्स एनॉनिमस (ए. ए.) मालवण या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ वा. यावेळेत मद्य मुक्ती बाबत जनजागृती सभा काळाबादेवी एक्झॉटीका, कुरण -चिवला बीच मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

रोज अति दारू पिण्याची इच्छा होणे हा एक मद्यापाश नावाचा आजार आहे. यां आजारातून मुक्त होऊन समाजात चांगले जीवन जगता येते. रोज पिणाऱ्या व्यक्तींसाठी या आजाराबद्दल माहिती देऊन जागृती निर्माण करत यासाठी संस्थेच्छा विनामूल्य मदतीविषयी विशेष माहिती यां सभेत देण्यात येणार आहे. या सभेला अध्यक्ष म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे तसेच मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सर्वांनी यां सभेस उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी ९८६०४३६७६५, ७५८८९०६६९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!