रांगोळी आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विभागस्तरीय स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कुलच्या समीर चांदरकर आणि सौ. वीणा शिरोडकर या शिक्षकांचे सुयश

रांगोळी आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विभागस्तरीय स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कुलच्या समीर चांदरकर आणि सौ. वीणा शिरोडकर या शिक्षकांचे सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*रांगोळी आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विभागस्तरीय स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कुलच्या समीर चांदरकर आणि सौ. वीणा शिरोडकर या शिक्षकांचे सुयश*

*मालवण (प्रतिनिधी)*

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली येथे शिक्षक व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी आयोजित कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेत सहाय्यक शिक्षक मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक समीर अशोक चांदरकर यांच्या डिजिटल शिक्षण या रांगोळीला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विभागीय स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका सौ. वीणा मिलिंद शिरोडकर यांच्या विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओची पहिल्या पाच क्रमांकामध्ये निवड होऊन राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेतील यशस्वीतेसाठी श्री. समीर चांदरकर व सौ. वीणा शिरोडकर यांचे वराडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त – कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य श्री. कांबळे यांनी व सहकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!