मालवण तहसीलदारपदी गणेश लव्हे यांची नियुक्ती

मालवण तहसीलदारपदी गणेश लव्हे यांची नियुक्ती

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण तहसीलदारपदी गणेश लव्हे यांची नियुक्ती*

*मालवण (प्रतिनिधी)*

गेले दीड महिना रिक्त असणाऱ्या मालवणच्या तहसीलदार पदावर गणेश दादासो लव्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून काल दुपारी श्री. लव्हे यांनी मालवण तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला.

गेले दीड महिना मालवणचे तहसीलदार पद हे प्रभारी होते. मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मालवण तहसीलदार पदाचा पदभार सोडला होता. तेव्हापासून रिक्त असणारे हे पद प्रभारी अधिकाऱ्यांकडे होते. शासनाने काल कोल्हापूर शाहूवाडी मलकापूर येथील तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यानंतर मालवण तहसीलदार पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवेढा येथे नायब तहसीलदार म्हणून तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी काम केले आहे. श्री. लव्हे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच नोकरीच्या निमित्ताने सेवा बजावत आहेत. श्री. लव्हे यांना पदभार स्वीकारल्यानंतर अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय व्यक्तींनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!