*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार निलेश राणेंनी दिल्या संजू परब यांना शुभेच्छा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदी भरघोस मतांनी विजयी झाले. हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट कौल आहे. संजू परब यांच्या या यशाबद्दल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार निलेशजी राणे यांनी श्री. परब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँक संचालक श्री. विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, भूषण सारंग आदी उपस्थित होते.

