दोडामार्ग–विजघर रस्ता वादावर उबाठा सेनेचे प्रत्युत्तर

दोडामार्ग–विजघर रस्ता वादावर उबाठा सेनेचे प्रत्युत्तर

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग–विजघर रस्ता वादावर उबाठा सेनेचे प्रत्युत्तर*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग–विजघर रस्त्याच्या कामाबाबत शिवसेना (शिंदे) पक्षाने केलेल्या आरोपांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उत्तर दिले आहे. उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले.
आमचा विरोध विकासाला नसून, चुकीच्या व दर्जाहीन पद्धतीने होणाऱ्या कामांना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराशी साटेलोटे असल्यामुळे आमच्या भूमिकेवर टीका होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्यासाठी कोणताही दबाव किंवा कारवाई झाली तरी सामना करू, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग–विजघर रस्त्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
यावेळी संपर्कप्रमुख केशव धाऊसकर, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक व संदेश राणे, विभागप्रमुख संतोष मोर्ये, सिद्धू कासार, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!