विद्यानिकेतनचा क्रीडा महोत्सव संपन्न

विद्यानिकेतनचा क्रीडा महोत्सव संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यानिकेतनचा क्रीडा महोत्सव संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी(प्रथमेश गुरव)*
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. दरम्यान, या स्कूलने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त सर्व विद्याथ्र्यांना मोफत टी-शर्ट वाटण्यात आले. याचा शुभारंभ मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रि प्रायमरी ते चौथीपर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी बॉल इन इ बास्केट, धावणे, लिंबू चमचा, सुई दोरा, बुक बॅलÏन्सग तर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी गोळा फेक, थाळीफेक, धावणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन तसेच सामुहिक स्पर्धांमध्ये मुलींसाठी लगोरी, खोखो, रस्सीखेच, डॉजबॉल, रिले तर मुलांसाठी क्रिकेट, कबड्ड, व्हॉलीबॉल, खोखो, रिले आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या संघांना ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट तर उपविजेत्या संघांना मेडल व प्रमाणपत्र तसेच विद्याथ्र्यांना मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांच्या हस्ते गोल्ड, सिल्व्हर, ब्रााँझ मेडल्स आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी क्रीडा सचिव धनराज शिंदे याने विद्याथ्र्यांना क्रीडा दिनाची शपथ देण्यात आली. शाळेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इयत्ता पाचवी त दहावीच्या रेड, यलो, ग्रीन व ब्ल्यू या चारही हाऊसच्या विद्याथ्र्यांनी तसेच इयत्ता पहिली ते चौथी व प्रि प्रायमरीच्या विद्याथ्र्यांनी ड्रिलचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाला उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी आनंद परूळेकर, क्रीडा शिक्षक दिनेश जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक गजानन पालयेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!