विजघर–दोडामार्ग राज्य मार्गावरील नियोजनशून्य खोदकाम धोकादायक – रविकिरण गवस

विजघर–दोडामार्ग राज्य मार्गावरील नियोजनशून्य खोदकाम धोकादायक – रविकिरण गवस

*कोंकण एक्सप्रेस* 

*विजघर–दोडामार्ग राज्य मार्गावरील नियोजनशून्य खोदकाम धोकादायक – रविकिरण गवस*

*दोडामार्ग; शुभम गवस*

विजघर ते दोडामार्ग राज्य मार्गावर सुरू असलेले नियोजनशून्य खोदकाम अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष म. रविकिरण रामदास गवस यांनी दोडामार्ग तहसीलदारांकडे निवेदन सादर केले.
खोदकाम सुरू असतानाही ट्रायल रोड, बॅरिकेडिंग व सूचना फलक नसल्याने वाहनचालक व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा ये-जा करतात. मात्र सध्याची स्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ट्रायल रोड केल्याशिवाय काम थांबवावे, दोषींवर कारवाई करावी व तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी गवस यांनी केली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास अपघातांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!