*कोंकण एक्स्प्रेस*
*कणकवली नगरपंचायत गट स्थापनेसाठी जिल्हाधिकाऱ्याना पत्र सादर*
*सिधुदूर्ग नगरी : कणकवली*
नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यातआला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची तत्वतः मान्यता घेण्यात आली आहे
सिंधुदुर्ग नगरी येथे कणकवली चे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणिनगरसेवकयांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन गटाला मान्यता देण्याबाबत पत्र सादर केले यावेळी नगरसेवक सुशांत नाईक सह नगरसेवक उपस्थित होते त्यात दिलेल्या पत्रात सर्व नवनिर्वाचित नगरसेवक कणकवली नगरपंचायतीच्या डिसेंबर २० मध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत क्रांतीकारी विचार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजयी झाल आहोत. आमच्या . २४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत आम्ही ९ नगरसेवकांनी कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी गट २०२५ या गटाच्या गटप्रमुखपदी श्री. राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर यांची एकमताने निवड केलेली आहे. श्री. राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर यांनी सही केलेला नमूना १. त्याच प्रमाणे सर्व ९ ही नगरसेवकां सह्या असलेले नमूना क्र. ३ चे ६ फॉर्म मिळून ७ फॉर्मस सोबत जोडलेले आहेत. यात
प्रभाग क्रमांक१श्री. संदेश भास्कर पारकर (थेट नगराध्यक्ष )२श्री. राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर (प्रभाग क्र. १४ )३श्री. जयेश विजय धुमाळे
(प्रभाग क्र. १३ )४ सौ. सुमेधा सखाराम अंधारी (प्रभाग क्र. ६ )५
सौ. जाई निकीत मुरकर (प्रभाग क्र. ४ ),६श्री. संकेत श्रीधर नाईक (प्रभाग क्र. १५ )७श्री. सुशांत श्रीधर नाईक (प्रभाग क्र. १७ ),८श्री. लुकेश गोविंद कांबळे (प्रभाग क्र. ८ ),९सौ. वैष्णवी विशांत सरमळकर (दिपिका प्रदिपकुमार जाधव) (प्रभाग क्र. ११ )
आदींच्या सह्यांचे पत्रश्री. संदेश भास्कर पारकर थेट नगराध्यक्ष यांच्यासहीनेजिल्हाधिकारी यांना सादर केले आहे त्याला त्यांनी तत्वता मान्यता असल्याचे सांगण्यात आले.

