*कोंकण एक्स्प्रेस*
*मालवण शहरातील देऊळवाडा – आडारी रोड परिसरातील भागात कमी दाबाचा विद्युत पुरवठा*
*उबाठा शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी उमेश चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे दिले निवेदन*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण शहरातील देऊळवाडा – आडारी रोड परिसरातील भागात कमी दाबाचा विद्युत पुरवठा वारंवार होत असल्याने या भागातील नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे, त्यामुळे याभागात थ्री फेज लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी उबाठा शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी उमेश चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण शहरातील देऊळवाडा – आडारी रोड परिसरातील भागात कमी दाबाचा विद्युत पुरवठा वारंवार होत असतो. यामुळे येथील भागातील नागरिकांच्या घरातील, दुकानातील विद्युत उपकरणे जाळून खाक होतात. बऱ्याचदा येथून होणारा वीज पुरवठा खंडित होत असतो. या परिसरात अधिकाधिक वीज ग्राहक असून सध्याचा विद्युत पुरवठा हा अपुरा व अखंडीत पडत आहे. यामुळे सतत होणाऱ्या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या ठिकाणी वीज अभियंत्यांनी पाहणी करून तात्काळ थ्री फेज लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उमेश चव्हाण यांच्यासहराजू किर, श्याम आजगावकर,विशाल आजगावकर, स्वप्निल मालवणकर, अमित बोर्डवेकरभूषण मुंबरकर, बाळू दाभोलकर आदी उपस्थित होते.

