*कोंकण एक्सप्रेस*
*शिरोडा वेळागर प्रश्नी झालेला करार शेतकऱ्यांना वगळूनच :लवकरच पर्यटनमंत्री ,पालकमंत्र्यांची भेट घेणार*
*न्याय मागण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना . निवेदन सादर*
*सिधुदुर्गनगरी*
शिरोडा वेळागरवाडी, येथीलग्रुप प्रकल्पाला आमचा विरोध नाही १६० एकर पैकी पर्यटन विकासाकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या विस्तीर्ण संपादित क्षेत्रातून केवळ सु. ०९ हेक्टर क्षेत्र वगळून स्थानीक शेतकऱ्यांना मिळावी हाच आमचा हट्टा आहे माजी पर्यटनमंत्री मान. ना. श्री. गिरीशजी महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाचीपूर्तता करताना सामंजस्य करारात शेतकऱ्यांना बाजूला ठेवली असून या सामंजस्य करारात स्थानिक भूमिपुत्र नाहीत याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले असून राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष वेधणार आम्हाला जर नव्हे तर क्षेत्र वगळले नाही तर आमचा हा प्रकल्पाला विरोध नाही परंतु ९हेक्टर जागा वगळून मिळेपर्यंत विरोध कायम राहणार असा इशाराच जयप्रकाश चमत्कार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर यानी दिला आहे
सिंधुदुर्ग नगरी येथे वेळागर . शिरोडायेथील भूमिपुत्र शेतकऱ्यांनी झालेल्या सामंजस्य कराराच्या बाबत आणि ९ हेक्टर जागा शेतकऱ्यांना मिळावीया मागणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेयांची भेट घेऊन लक्ष वेधले यावेळी माजी आमदार राजन तेली संघटनेचे नेते जयप्रकाश चमणकर ,संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गावडे, सल्लागार भाऊ अंदुर्लेकर आदींसह शेतकरी उपस्थित होते
यावेळी दिलेल्या निवेदनात पर्यटनमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला) येथील ताज प्रकल्पासाठी त्रिसदस्यीय करारपत्रावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. यातील वृत्तांतानुसार स्थानिक भूमिपुत्रांना डावलून पूर्णपणे अंधारात ठेवून हे करारपत्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आम्ही गेली कित्येक वर्षे एकूण सुमारे ४१.६३.२० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ सु. ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी शासनाकडे करीत असून त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे, माड बागायत आहे, दुबार पीक येणारी शेतजमीन आहे, काजूची झाडे आहेत, तसेच राहती घरे, गांगर, शौचालये, विहीरी, धार्मिक स्थळे आहेत. म्हणूनच आम्ही सदरचे केवळ सु. ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी सुरुवातीपासून केलेली होती व ती आजही आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, या क्षेत्राखेरीज आम्हा शेतकऱ्यांकडे अन्यत्र कुठेही कोणतीही जमीन व उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नाही.सर्व संबंधित मंत्री , सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पर्यटन विभाग यांचेकडे याबाबतची सविस्तर निवेदने वारंवार देऊन मागणी लावून धरली आहे. तसेच न्याय मिळण्यासाठी खाडीपात्रातील पाण्यात उतरून जलआंदोलन, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आझाद मैदान मुंबई येथे उपोषण अशा माध्यमातून न्याय मिळण्यासाठी कळकळीचे प्रयत्न केले. तसेच दि. ०३/१०/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी येथे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, माजी आमदार श्री. राजन तेली, म.प.वि.म.चे कार्यकारी तंबालक, ताजग्रुपचे कार्यकारी संचालक यांचेशी व्हिसी द्वारे आयोजित केलेल्या चर्चेत आमच्यासंघटनेमार्फत अध्यक्ष, सचिव, सल्लागार, व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आमची मागणी मांडली होती. परंतु प्रत्येक वेळी आम्हाला पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्यक्षात मात्र आज मितीपर्यंत कोणताही दिलासा दिलेला नाही.
शिरोडा ग्रामपंचायतीच्या दि. २५/९/२०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा होऊन जोपर्यंत आम्ही मागणी केलेले सु. ९ हे. क्षेत्र वगळण्यात येणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारच्या कामासाठी (development) कोणतीही ना-हरकत देण्यात येऊ नये असा ठराव एकमताने संमत करण्यात आलेला आहे, तरी गावातील नागरीकांचे मत व भूमिका याची दखल घेण्यात येऊन त्याचा सन्मान राखला जावा अशी विनंती आहे. (सोबत ठरावाची प्रत जोडली आहे.)
दिनांक १३ माहे ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन पर्यटनमंत्री श्री. गिरीशजी महाजन, स्थानिक आमदार तथा माजी शिक्षणमत्री श्री. दीपकभाई केसरकर वगैरे यांनी शिरोडा वेळागर भागात भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन पर्यटनमंत्री मा. श्री गिरीशजी महाजन यांनी वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आले असताना आम्हा शेतकऱ्यांना उपरोक्त विषयांकीत सु. ९ हे. क्षेत्र वगळण्याबाबत ठोस असे आश्वासन दिलेले होते. मात्र त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. सु. ९ हे. क्षेत्र वगळण्याबाबत कार्यवाही करुन आम्हाला दिलासा द्यावा. व तोपर्यंत वेळागर येथील एकूण पर्यटन क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यात येऊ नये किंवा तशी परवानगी कोणत्याही कंपनीस देण्यात येऊ नये अशी मागणी आहे
याबाबत जिल्हाधिकारी यांना आपण पर्यटन विभागाला योग्य तो अहवाल सादर करावा लवकरच राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन याबाबत शिष्टमंडळ मार्फत आमदार निलेश राणे यांच्या समवेत भेट घेणार असल्याचेहीमाजी आमदार राजन तेली यांनीयावेळी बोलताना सांगितले.

