*शिरगांव येथील जागृत श्री पावणाई देवालयात 30 जाने. ला हरिनाम सप्ताह*

*शिरगांव येथील जागृत श्री पावणाई देवालयात 30 जाने. ला हरिनाम सप्ताह*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव येथील जागृत श्री पावणाई देवालयात 30 जाने. ला हरिनाम सप्ताह*

*शिरगाव : संतोष साळसकर*

माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी आणि भक्ताला दिलेल्या वचनाला जागणारी तसेच नवसाला पावणारी अशी जिची सर्वत्र ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगाव गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार ३० डिसेंबर रोजी पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
देवगड-निपाणी राज्यमार्गावर शिरगाव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीचे सुरेख देवालय आहे. उत्सव काळात देवालय आणि परिसराला डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. माहेरवाशिणींची या ग्रामदेवतेवर अगाध श्रद्धा आहे. पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी या देवालयात मोठ्या थाटामाटात साजरा होणाऱ्या हरिनाम सप्ताहास दूर दूरवरून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिणी, भाविक कृपा आशीर्वादासाठी शिरगाव येथे येतात. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील व्यापारी, महिला बचतगट छोटेखानी दुकाने थाटतात. या हरिनाम सप्ताहास भाविकांनी, भजनी मंडळींनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री पावणादेवी देवालय विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!