वक्तृत्व स्पर्धेत माधव ओगले प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत माधव ओगले प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*वक्तृत्व स्पर्धेत माधव ओगले प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

नगर वाचनालयातर्फे 20 डिसेंबर रोजी अविनाश ना. शेणई पुरस्कृत श्रीमती लक्ष्मी नारायण शेणई स्मृती पाचवी ते सातवीसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम-माधव ओगले (वेंगुर्ला नं.2), द्वितीय-सोनाक्षी तेंडोलकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), तृतीय-आर्या चेंदवणकर (एम.आर.देसाई) तर पर्णवी वागळे (एम.आर.देसाई) हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण महेश बोवलेकर, कैवल्य पवार यांनी केले. विजेत्यांना 18 जानेवारी रोजी गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!