ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करा-गोविंद काजरेकर

ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करा-गोविंद काजरेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करा-गोविंद काजरेकर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

विद्याथ्र्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादिशेने प्रामाणिकपणे व चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा या जगात आपण नगण्य ठरू. यासाठी वाचन वाढविले पाहिजे, आपले हस्ताक्षर सुंदर केले पाहिजे व दिवसाचे किमान सहा तास आत्तापासून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी केले.
अणसूर-पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ नुकताच हायस्कूलच्या बहुउद्देशिय सभागृहात संपन्न झाला. यावेळी अणसूरपाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष गोेविंद गावडे, ज्येष्ठ कवी, समिक्षक व गोगटे वाळके कॉलेजचे प्राचार्य गोविंद काजरेकर, संस्था सचिव लिलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रिती गावडे, संस्था सदस्य अशोक गावडे, राजन गावडे, पाल माजी सरपंच व दाते वासुदेव बर्वे, अनिल गडकर, अणसूर पोलिस पाटील अश्विनी खवणेकर, कमलेश गावडे, अनंत मांजरेकर व ज्येष्ठ शिक्षिका अक्षता पेडणेकर, ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
शासन निर्णय आणि कमी होत जाणारी शाळेची पटसंख्या यामुळे गावागावातील शाळांच्या अस्तित्त्वाबद्दल धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावची शाळा संस्था कधीही बंद पडू देणार नाही. त्यासाठी जे जे प्रयत्न करणे शक्य आहे ते संस्था म्हणून आम्ही करणार असल्याचे गोविंद गावडे यांनी सांगत भविष्यात हायस्कूलमध्ये संगणक, संगीत, क्रीडा शिक्षक आणणे, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी काही प्राथमिक शाळा दत्तक घेणे, अद्ययावत लायब्रारी, करियर मार्गदर्शन वर्ग, वाहतूक सुविधा आदी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. आगामी वर्षात 25 जानेवारीला आपली कन्या डॉ.स्नेहा गावडे यांच्या माध्यमातून हायस्कूलच्या तिन्ही वर्गांत डिजिटल बोर्ड बसवून आपली शाळा जिल्ह्रातील “पहिली स्मार्ट शाळ’ बनविण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला. गावची मराठी माध्यमाची शाळा आत्ताच्या काळात टिकविणे किती आवश्यक आहे व त्यासाठी संस्था कशी प्रयत्नशील आहे हे लिलाधार गावडे यांनी स्पष्ट केले.
विद्याथ्र्यांनी साकारलेल्या “पक्षीजगत’ या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन गोविंद गावडे व ‘कलाविष्कार’ या शालेय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य गोविंद काजरेकर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण प्रसंगी मार्च 2025मध्ये झालेल्या दहावी परीक्षेतील प्रथम-साहिल गावडे, द्वितीय-धनश्री गावडे व तृतीय-लक्ष्मी तेंडोलकर यांना गावातील दाते व संस्थेने ठेवलेल्या रक्कमेतून रोख बक्षिसे देऊन तसेच प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्याथ्र्यांना आजी-माजी शिक्षकांकडून रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिसे देऊन तर आठवी व नववीमध्ये प्रथम आलेल्या विद्याथ्र्यांना रोख रक्कमेचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
विद्याथ्र्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी हायस्कूलमध्ये गेले वर्षभर वक्तृत्व, निबंध, रांगोळी, हस्ताक्षर, गीतगायन अशा स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांनाही गावातील दात्यांनी व संस्थेने ठेवलेल्या रक्कमेतून बक्षिसे देण्यात आली. शालेय क्रीडा महोत्सवातील यशस्वी खेळाडूंना प्रशस्तिपत्र तसेच सुवर्ण, रौप्य व ब्राॉन्झ पदके देण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्राची गावडे व संतोष नाईक यांना विशेष प्रमाणपत्र व पदक तसेच वेदांत गावडे व हर्षदा गावडे यांनाीही सन्मानित करण्यात आले. सन 2025-26चा “आदर्श विद्यार्थी’ बहुमान प्राप्त श्रीयश मालवणकर याचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अणसूर आणि पाल या दोन्ही गावातील दात्यांनी ठेवलेल्या रोख रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी प्रामाणिक व होतकरू विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीही होतकरू विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत प्रथम व यशस्वी सर्व विद्यार्थी तसेच मार्गदर्श हिंदी शिक्षिका चारूता परब यांना गौरविण्यात आले.
मराठी साहित्यातील योगदानासाठी प्राचार्य गोविंद काजरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सुपारीचे रोप देऊन संस्था व हायस्कूलच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी केले. सूत्रसंचालन विजय ठाकर , बक्षिस वाचन अक्षता पेडणेकर व चारूता गावडे-परब यांनी तर संचिता परब यांनी आभार मानले.
याचदिवशी सायंकाळी आजी-माजी विद्याथ्र्याच्या विविध गुणदर्शनाचा “रंगशिशिर’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यात विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक, गायन, वादन व अभिनयांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रसिताद दिला. माजी विद्यार्थीनी अलिशा पालकर दिग्दर्शीत “गड आला पण सिंह गेला’ या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
फोटोओळी – अणसूर-पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!