*कोकण Express*
*जिल्ह्यातील चार राष्ट्रीय बँकांचे असहकार्य…*
*दिशा समितीत खुद्द जिल्हधिकाऱ्यांची तक्रार सर्व बँकांची बैठक घेण्याचे खा राऊत यांचे आश्वासन*
*ओरोस ःःप्रतिनिधी*
जिल्ह्यातील चार राष्ट्रीय बँका शासकीय योजनाना सहकार्य करीत नाहीत. कर्ज मंजूर करीत नाहीत. आपण वारंवार लेखी पत्र काढून सुद्धा या बँका दुर्लक्ष करीत असल्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी शुक्रवारी दिशा समिती सभेत सांगितले. यावेळी लीड बँक व्यवस्थापक यानीही सहकार्य करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व बँकांची बैठक घेण्यात येईल, असे समिती अध्यक्ष खा विनायक राऊत यानी सांगितले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण तथा दिशा समितिची सभा जिल्हाधिकारी सभागृहात खा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, ऑनलाईन आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सदस्य सोमा घाडीगांवकर, संजय गावडे, सुजीत जाधव, नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप गिरप, महेश कांदळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहय्य्यक संचालक जगदीश यादव यांसह बहुसंख्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.