आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतीचा विकासाचा आदर्श; महिला भवनाचे लोकार्पण

आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतीचा विकासाचा आदर्श; महिला भवनाचे लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस*

*आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतीचा विकासाचा आदर्श; महिला भवनाचे लोकार्पण*

*दोडामार्ग : शुभम गवस*

आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायत नियोजनबद्ध व लोकाभिमुख विकासकामांमुळे जिल्हा व राज्य पातळीवर आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत व दोडामार्ग तालुक्यातील पहिल्या महिला भवनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला भवन उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हत्ती उपद्रवाच्या समस्येकडेही लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. साक्षी देसाई यांनी प्रास्ताविक केले. या लोकार्पण सोहळ्याला नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, उपसरपंच सौ. वैशाली गवस, माजी सरपंच संदीप देसाई, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, समीर देसाई, रामदास मेस्त्री, भगवान गवस, गोपाळ गवस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गवस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!