कोकणरेल्वे चे प्रश्न सोडविण्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधणार प्रभाकर सावंत

कोकणरेल्वे चे प्रश्न सोडविण्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधणार प्रभाकर सावंत

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणरेल्वे चे प्रश्न सोडविण्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधणार प्रभाकर सावंत*

*सिधुदुर्गनगरी*

सिधुदुर्गनगरी २३ कोकण रेल्वेच्याप्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या टर्मिनल जंक्शन आणि सोयी सुविधा प्रश्नांबाबत माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ,पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करून या समस्यांना न्याय दिला जाईल तसेच सिंधुदुर्ग स्टेशन जोडणारे आणाव आणि रानबांबुळी ॲप्रोज रोड तात्काळ काढण्याबाबत रेल्वेचे विभागीय अधिकारी शैलेश बापट यांच्याशी चर्चा करून येत्या आठवड्याभरात कार्यवाही करू असे आश्वासन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांच्या समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रभाकर सावंत यांची भेट घेण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहाही रेल्वे स्थानकांच्या विविध समस्यांची माहिती घेत कोकण रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावर लवकरच या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी समितीचे सचिव अजय मयेकर,कार्याध्यक्ष शुभम परब,मीडिया प्रसिद्धी प्रमुख संजय वालावलकर,सहखजिनदार जयंद्ररथ परब,अणाव पोलीस पाटील सुनील पाटकर,सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक समितीचे सहसाचिव राहुल शिर्के,समितीचे सल्लागार पंडित माने सर,सुकळवाड सरपंच किशोर पेडणेकर उपस्थित होते .
कोकण रेल्वेच्या या प्रश्नाबाबत सातत्याने कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती प्रयत्नशील असून या प्रश्नाला न्याय देण्यासाठीखासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत निवेदन देण्यात आली होती जिल्ह्यातील दहाही स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा नांदगाव वैभववाडी सिंधुदुर्ग या स्टेशनवर पी आर एस तिकीट सिस्टीम तसेच मडूरा ते खारेपाटण दरम्यानजिल्ह्यातून सतत धावणारे जलद गाड्यांपैकी काही गाड्या निश्चित ठरवून दिलेल्या स्टेशनवर थांबा मिळावा जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सिंधुदुर्ग स्टेशनवर आणि कणकवली स्टेशनवर प्रत्येकी दोन याप्रमाणे गाड्यांना थांबा दिला आहे उर्वरित स्टेशनवर ३५ गाड्यांपैकी काही गाड्या थांबाव्यात अशी प्रवासी संघटनेची मागणी आहे याचबरोबर आर्चीर्णे,मडूरेसारख्या काही स्टेशनवर स्टेशनवर जायला रस्ता नाही स्टेशनवर बसणाऱ्या प्रवाशांना बाकडे व अन्य सोयी सुविधा चहाची टपरीही नाही अशा अनेक समस्यांमध्ये प्रवासी हा त्रास सहन करत आहेत खारेपाटन सारख्या काही स्टेशनवर प्रवाशांना शिर्डी देऊन उतरावे लागते तो प्लॅटफॉर्म उंच करावा ,कोकण कन्या रेल्वे गाडीला वाढती गर्दी लक्षात घेऊनशिवाजी टर्मिनल किंवा दादर वरून स्वतंत्र रेल्वे सोडावी ही मागणी जोर धरू लागली आहे याशिवाय सावंतवाडी टर्मिनल चा प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत असतानाखासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेले मडुरे या स्टेशनवर जंक्शन किंवा टर्मिनल करण्याच्या उद्देशानेदिलेल्या आदेशावर रेल्वे प्रशासनाने जागाही संपादित केली. ज्या प्रकल्पग्रस्तांनी रेल्वेसाठी जागा दिल्यात्या कोकणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरीही मिळाल्या नाहीत पर राज्यातील आणि परत जिल्ह्यातील लोकांना संधी दिली यावर मडुरे येथील सुरेश गावडे यांनी सातत्याने रेल्वे समितीच्या माध्यमातून आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे याकडे लक्ष द्यावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे यावर लक्ष द्यावा असे सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!