मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात : गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य

मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात : गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य

*कोंकण एक्सप्रेस*

*मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात : गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य*

*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*

तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत आज मंगळवारी (२३ डिसेंबर) दुपारी १.३० च्या दरम्याने झालेल्या भीषण अपघात गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य झाला आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली हुडकुंबेवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या कामानिमित्त वेंगुर्ले रामघाट येथे भाड्याने राहणारे मदन अच्युत मेस्त्री ( वय- ४५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान अपघातात मोटारसायकलचे डबल स्टँड पाठीत घुसून अतिरक्तस्रावाने मेस्त्री यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.
याबाबत मयत मदन यांचे भाऊ गुरुनाथ मेस्त्री यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी चालक बांदा डेगवे येथील नागेश पांडुरंग दळवी (वय -३२) याच्या विरोधात तक्रार मेस्त्री यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर बराच वेळ दुचाकीस्वार मेस्त्री हे घटनास्थळीच राहिले. दुचाकीचे स्टँड पाठीत घुसल्याने ते कापल्याशिवाय मेस्त्री यांना रुग्णालयात दाखल करणे शक्य नव्हते. यामुळे मेस्त्री यांचा जास्त रक्तस्त्राव झाला. यावेळी घटनास्थळी मठ येथील मंदार कामत, सुनील तेंडोलकर यांनी ग्राइंडरने ते स्टँड कापून मेस्त्री यांना गाडीपासून वेगळे केले.
यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मेस्त्री यांना मयत घोषित केले.
यावेळी घटनास्थळी मठ येथील अनिल तेडोलकर, किशोर पोतदार,बसमीर नाईक, प्रशांत बोवलेकर, वेंगुर्ले येथील भूषण सारंग, हेमंत गावडे, तुषार साळगावकर, गौरेश वायंगणकर, शरद मेस्त्री यांच्यासहित उपस्थित ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. या घटनेनंतर घटनास्थळी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक राठोड यांच्यासहित पोलीस नाईक स्वप्नील तांबे, दीपा मठकर, जयेश सरमळकर, बंटी पालकर, मनोज परुळेकर व होमगार्ड यांनी दाखल होत वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला.
मेस्त्री यांचा मृतदेह तुळस येथे शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात दिली. यावेळी रुग्णालयात तसेच वेंगुर्ले पोलीस स्थानकात तेंडोली ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मयत मदन मेस्त्री यांच्या पश्चात पत्नी व दीड ते दोन वर्षांची मुलगी असल्याने मेस्त्री यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पोलीस स्थानकात माजी सरपंच मंगेश प्रभू, अरुण राऊळ, नितीन सर्वेकर, आशिष खानोलकर, भाऊ पारकर, अच्युत पोतकर, रामचंद्र राऊळ, नाना प्रभू , प्रमोद खानोलकर, पराग प्रभू, शरद राऊळ यांच्यासहित तेंडोली ग्रामस्थ तसेच वेंगुर्ले नगरसेवक सुहास गवंडळकर, सुधीर पालयेकर, गौरी मराठे, ठाकरे सेनेचे संजय गावडे, भाजपचे बाळू प्रभू, हेमंत गावडे, भूषण आंगचेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!