*कोंकण एक्सप्रेस*
*परमहंस भालचंद्र महाराज यांचा 4 जानेवारीपासून जन्मोत्सव सोहळा*
*विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
योगीयांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा रविवार 4 जानेवारी ते गुरुवार 8 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
रविवार 4 जानेवारी ते बुधवार 7 जानेवारी या कालावधीत पहाटे 5.30 ते 8 वा. काकड आरती, समाधी पूजा, अभिषेक, सकाळी 8 ते 12.30 वा. सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महारुद्र स्वहाकार विधी, दुपारी 12.30 ते 3 वा. आरती व महाप्रसाद दुपारी 1 ते 4 भजने, सायं. 4 ते 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती होणार आहे. रविवार 4 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 12.30 वा. या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. बुधवार 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 वा. या वेळेत 122 रक्तदात्यांचे रक्तदान होणार आहे. गुरुवार 8 जानेवारी हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मदिन आहे. यानिमित्त पहाटे 5.30 ते 8 काकड आरती, समाधी पूजा, जपानुष्ठान, सकाळी 8 ते 9 वा. भजने, सकाळी 9 ते 11.30 समाधी स्थानी लघुरुद्र, सकाळी 9.30 ते 12 वा. जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प श्री. भाऊ नाईक, रा. वेतोरे) दुपारी 12 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्म सोहळा, दुपारी 12.30 ते 3 आरती व महाप्रसाद, सायं. 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, तसेच वारकरी मंडळींच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक नंतर आरती होणार आहे. तर रात्री 12 वा. नंतर कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत ट्रिकसीनयुक्त ‘गज वज्रकाय संगम’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

