लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र अत्याधुनिक कोविड सेंटर…

लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र अत्याधुनिक कोविड सेंटर…

*कोकण Express*

*लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र अत्याधुनिक कोविड सेंटर………..*

*डॉ. आर. एस. कुलकर्णी यांची माहिती………..*

*ओरोस प्रतिनिधी:* 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता पडवे येथील राणेंच्या एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी दिली.जिल्हावासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाईफ टाईम हॉस्पिटल येथे कोविड-१९ विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षाचे पूर्णपणे विलीगीकरण करण्यात आले असून या विभागात विशेष डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात गरज वाढल्यास हे बेड आणखी वाढविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा खा. नारायण राणे, सौ निलमताई राणे, निलेश राणे, नितेश राणे यांनी ही सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!