कणकवली नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार

कणकवली नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार*

*संदेश पारकर यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपंचायतसमोर स्वागतासाठी केली गर्दी*

*न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पारकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत निवडणूकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर हे विजयी झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी संदेश पारकर यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपंचायतसमोर स्वागतासाठी गर्दी केली होती. तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा एकदा कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी संदेश पारकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नगरपंचायत कार्यालयाचे मुख्यद्वार ते नगराध्यक्ष कक्षाच्या दालनापर्यंत पाय-यांवर झेंडूच्या फुलांचा सडा… नगराध्यक्षाच्या दालनापर्यंत जाताना संदेश पारकर यांच्यावर महिला कार्यकर्त्यांनी केलेली पुष्पवृष्टी…. कार्यकर्त्यांच्या गराडा अन् जल्लोषाचे वातावरण… फटक्यांची आतषबाजी… या उत्साही माहोल मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीच्या नगराध्यक्षपदाचा पदाभार स्वीकारला.

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे दाखल होताच नगरपंचायत मुख्यद्वारावर संदेश पारकर यांचे आगमन झाल्यानंतर फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी प. पू. भालचंद्र महाराज की जय… संदेश पारकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, संदेश पारकर यांचा विजय असो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न. पं. कार्यालयाच्या मुख्यद्वारावर आगमन होताच महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यदार ते नगराध्यक्ष दालनापर्यंत फुलांच्या सडयावरून संदेश पारकर हे नगराध्यक्ष दालनापर्यंत जात असताना त्यांच्यावर महिला कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टीकरत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासमवेत माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, जाई मुरकर, दीपिका जाधव, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दामू सावंत, प्रथमेश तेली, अॅड. सुदीप कांबळे, माजी उनगराध्यक्ष कन्हैया पारकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, भूषण परुळेकर, सुनील पारकर, बाळू पारकर, उत्तम वाळके, सोहम वाळके, प्रदीप आरोलकर, नीलम सावंत-पालव, साक्षी आमडोसकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, रिना जोगळे, स्नेहा वाळके, आदित्य सापळे, अमित मांडवकर, सौरभ पारकर यांच्यासह शेडको कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्षाच्या दालनात संदेश पारकर यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर पारकर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पारकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. पारकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना प.पू. भालचंद्र महाराज यांची प्रतिमा भेट स्वरुपात दिली. ही प्रतिमा देताना कार्यकर्त्यांनी प. पू. भालचंद्र महाराज की जय असा जयघोष केला. त्यानंतर पारकर यांना कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

माजी नगराध्यक्षांची ती खुर्ची बदलली –

नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनातील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बसण्यासाठी वापरलेली खुर्ची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांनी पदभार स्विकारण्यापूर्वीच हटवून बाजूला केली. त्या थेट विसर्जन नदीपात्रात केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नवे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना बसण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताबडतोब नवी खुर्ची आणून ठेवली. त्यानंतर संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!