*कोकण Express*
*खारेपाटण चेकपोस्टला प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली भेट*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता प्रादुर्भाव व लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाका खारेपाटण चेकपोस्टला आज सायंकाळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी भेट देऊन येथील कार्यरत कर्मचारी वर्गाशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, मंडल अधिकारी मंगेश यादव, खारेपाटण तलाठी यु. वाय. सिंगनाथ, खारेपाटण पोलीस प्रग मोहिते, सुयोग पोकळे, खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे, फार्मसीट डोंगरे तसेच आरोग्य व महसूल कर्मचारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी वैशाली राजमाने यावेळी येथील आरोग्य पथक रजिस्टरची पाहणी केली. तसेच कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्याशी चर्चा करून खारेपाटण तपासणी नाक्यावर सर्व सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले .