निवृत्त वेतन हा कायदेशीर हक्क मनोहर पालयेकर; कणकवलीत पेन्शनर डे कार्यक्रम उत्साहात साजरा

निवृत्त वेतन हा कायदेशीर हक्क मनोहर पालयेकर; कणकवलीत पेन्शनर डे कार्यक्रम उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*निवृत्त वेतन हा कायदेशीर हक्क मनोहर पालयेकर; कणकवलीत पेन्शनर डे कार्यक्रम उत्साहात साजरा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

निवृत्ती वेतन ही शासनाने दिलेली कोणतीही मेहेरबानी नसून तो निवृत्त वेतनधारवत्रचा कायदेशीर हक्क आहे. तो शाबूत राखण्यासाठी आम्ही नेहमी जागरुक राहू असे प्रतिपादन पेन्शनर असोसिएशन कणकवलीचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले. कणकवली येथे आयोजित ‘पेन्शनर डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी निवृत्त धारकांसाठी प्रबोधनपर मार्गदर्शनासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रबोधन सत्रात सहाय्यक लेखाधिकारी सुनील तांबे यांनी उपस्थित निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच निवृत्त धारकांच्या विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेत सखाराम सपकाळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात सौ. रीना भीसले यांनी निवृत्त धारकांना प्रेरणा देणारी आधार ही कविता सादर केली. तर लेखक व वत्र्वी राजस रेगे यांनी निवृत्तीनंतरचा आदर्श दिनक्रम कसाले सांगितले. या सोहळ्यात सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापिका सौ. वैशाली नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निवृन धारकांनी स्वतः अनेक विनोद सादर करून हास्यकल्लोळ उडवून दिला. दैनंविन धावपळीतून निवृत झाल्यानंतर अशा स्नेहसंमेलनामुळे सर्वांनाच एक वेगळा मानसिक आधार मिळाला.

या कार्यक्रमाला असीसिएशनचे सचिव विलास चव्हाण, सहसचिव सुगंधा देवरुखकर, बन्बीर भोजे, भारतभूषण रजपूत, विलास बुचडे, श्री. वंजारे सुरेश पारकर, कृष्णा दळवी, राजाराम परच, अर्जुन राणे यांसह तालुक्यातील अनेक सेवानिवृत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!