*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला परिट सेवा संघातर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला तालुका परिट सेवा संघातर्फे आज शनिवारी श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांनी समाज जागृत होण्यासाठी योगदान द्यावे असे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम माणिकचौक येथील कै.विवेक आरोलकर यांच्या निवासस्थानी पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांबाबत आपले विचार मांडले. दरम्यान, कोकण सिंधुदुर्ग बाजार कृषी समितीच्या उपसभापतीपदी प्रसाद पाटकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच डॉ. नेहा महेंद्र आरोलकर हिने “भाजीपाला विज्ञान’ या विषयात पी.एच.डी मिळविल्याबद्दल त्यांचा परिट सेवा संघातर्फे सन्मान करण्यात आला. डॉ.नेहा आरोलकर हिच्या अनुपस्थितीत तिच्या आईवडिलांनी हा सन्मान स्वीकारला.
या कार्यक्रमाला परिट सेवा संघाचे वेंगुर्ला अध्यक्ष महेंद्र आरोलकर, खजिनदार अशोक आरोलकर यांच्यासह सागर आवळेगांवकर, सुरेश आरोलकर, किरण खानोलकर, देविदास आरोलकर, सुभाष आरोलकर, उमेश आरोलकर, मंजुषा आरोलकर, सुलभा आरोलकर, गुरूनाथ मडवळ, जयानंद आरोलकर, सुनिल आरोलकर, सिद्धेश आरोलकर, वैदेही आरोलकर, मालाजी सांगेलकर, दिगंबर सांगेलकर, विलास आरोलकर, शेखर वेंगुर्लेकर, किशोर कोलगांवकर, आध्या आरोलकर, आरोही आरोलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार देविदास आरोलकर यांनी मानले.

